Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Girish Mahajan Dance Jalgaon : गिरीश महाजन यांचा तुफान डान्स, डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात रॅली 
रायगडच्या पालकमंत्री पदावरुन अडले नाशिकचे पालकमंत्री पद - कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता - कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी याधीच केले आहे नाशिक जिल्ह्यात कामाला सुरवात  - माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, दादा भुसे आणि गिरीश महाजन  यांच्यात होती पालकमंत्री पदाची स्पर्धा  छगन भुजबळ यांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांचा पत्ता कट झाला  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे याचे सध्याचे वादग्रस्त वक्तव्य, शासनाच्या सदनिका घोटाळावरून सुरू असणारी न्यायालयीन प्रक्रिया यामुळे माणिकराव कोकाटे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत  दादा भुसे यांनी मागील शिंदे सरकारमध्ये  पालकमंत्री पदाचे काम सांभाळले आहेत, सध्या शिक्षण मंत्री पद भूषवित आहेत. -  दादा भुसे सुरवातीला पालकमंत्री पदावर दावा करत होते, मात्र गिरीश महाजन यांच्या नावावर शिकमोर्तब होत असल्याने दादा भुसे यांनी दावा सैल केला आहे - रायडग चे मंत्रिपद राष्ट्रवादीने स्वता कडे ठेवले तर शिवसेना पुन्हा नाशिकच्या मंत्रीपदावर आपला हक्क सांगू शकतं.   डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेत  मंत्री गिरीश महाजन हे  दर वर्षी आवर्जून हजर राहत असतात, आजही त्यांच्या जामनेर मतदार संघात गिरीश महाजन यांनी मिरवणुकीत  सहभागी होत असताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्र रथाचे ट्रॅक्टर चालवत स्वारस्य केले यावेळी त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फेर धरावा असा भीम सैनिकांचा आग्रह त्यांना मोडता न आल्याने,मंत्री गिरीश महाजन यांनी ट्रॅक्टर वरच नाच करून,कार्यकर्त्यांच समाधान केले आहे.

Category

🗞
News

Recommended