Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/3/2025
Imtiaz Jaleel on Waqf : शिर्डी, तिरुपती बोर्डावर मुस्लिमांना घेणार का? इम्तियाज जलील यांचा सवाल

आम्ही बिलाला  विरोध केला आहे तो कायम आहे, कालच्या  भाषणातून फक्त एक मुस्लिम समाजाचा त्यांनी विषय घेतला आणि त्यातून वाद निर्माण केलाय, आता ट्रिपल तलाक झालं औरंगाजेब झालं आता मुस्लिम विरोध या बिलातून सुरुय... विरोधात समर्थनार्थ आकड्यात  फार फरक नाही कायदा बनवताना मतदानाची  टक्केवारी बघा.. आकडे होते दादागिरी केली आणि बिल पास केले..मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी महिलांना स्थान देण्यासाठी बिल आणले म्हणतात,  लाडकी बहिणीला न्याय दिला का, महिला आरक्षण बाबत कोट्यवधी खर्च केले महिलांना न्याय दिला का।।।   याबीलामुळे मोठा फरक हा आहे की waqf बोर्ड वर आता जिल्हाधिकारी बसवले म्हणजे वक्फ बोर्ड वर निर्बंध आले, कलेक्टर विरोधात आता हायकोर्टात जाता येईल असे म्हणतात,  कोर्टात 5 कोटी 20 लाख केस पेंडिंग आहेत आता वक्फ तिकडे जाईल म्हणजे न्याय मिळणार कधी...   अभ्यास साठी  जेपीसी कमिटी बनवली 25 राज्यात फिरले 97 लाख लोकांचे आक्षेप घेतले 1 हजार पानांची त्यांनी रिपोर्ट सादर केली, मात्र सरकारने रिपोर्ट कचऱ्यात टाकले आणि कॅबिनेट मध्ये बसून दुरुस्ती केली म्हणतात...   वक्फ बोर्डात नॉन मुस्लिम सदस्य  आणणार आहेत, , हुशार लोकांना संधी देणार म्हणे मग मुस्लिम समाजात हुशार नाही का, आम्हाला शिर्डी, तिरुपती,  शीख बोर्ड वर घेणार का.. फक्त वक्फ साठी हा निर्णय का   मोठी जमीन वक्फ कडे आहे,  मोठं मोठया नेत्यांकडे वक्फ जमिनी आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि मोदी साहेबांचे भक्त उद्योगपती ला जमीन देण्यासाठी हा घाट आहे...   आधीच्या नियमात ही सरकार निर्णय घेऊ शकत होते मात्र खुप जमीन असल्याचं चित्र निर्माण केले , अहो जमीन आहे कुठं ती  पेपर वर आहे नेत्यांनी गिळली आहे...   मुस्लिम समाज इशू निर्माण करतात आधी बुरखा चा त्यांनी घेतला, फक्त अटटेंशन divert करण्यासाठी विषय घेतात,  काही नाही तर औरंगजेब आहेच   वक्फ बोर्डात बदल गरजेचे होते, तिथं गैरप्रकार झाले आहेत मात्र त्यात असा कायदा नको होता, आधी तिथं घोळ अधिकाऱ्यांनी केले आणि सरकारने पाठीशी घातले...   अजित पवार मुस्लिम सोबत आहे सांगतात आता कुठे गेले, muslim पर्सनल बोर्ड ने बिलाचा  निषेध केलाय पुढे जे काही निर्णय ते घेतील ते आम्ही मानणार.. त्या पद्धतीने भूमिका ठरवणार...

Category

🗞
News
Transcript
00:00कि तुम्ही वग बोडा मधे नौन मुस्लिम ला समवेश करा
00:04और त्यांसा मनना है यह इंटेलेक्श्यल नौन मुस्लिम से है
00:09मी मोदी साहबान ना प्रश्ण विचारतों का
00:11मुस्लीम सामाजा मधे इंटेलेक्श्यलस नाई है का
00:13तुम्झे पेछा जास्त चांगले इंटेलेक्शॉल्स आहे समाजा मधे ही
00:17त्याना तुम्ही कसामिल करा न याचा मधे ही
00:19आणि असस तुम्ही करनार असेल
00:21तर इंतियास जलीला तुम्ही शिर्डी साही बाबा संस्थान मधे घेनार का?

Recommended