Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
अहिल्यानगर : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मॅच सुरु आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाल्या. शिर्डीतील साई मंदिरात नीता अंबानी त्यांच्या आई समवेत आल्या होत्या. या मंदिर परिसरातच एका चाहत्यानं नीता अंबानी यांना हात जोडून विनंती करत मोठी मागणी केली. रोहित शर्माला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचं कॅप्टन करावं, अशी मागणी त्या चाहत्यानं केली. या चाहत्याला नीता अंबानी यांनी देखील प्रतिसाद दिला.

रोहित को कॅप्टन करो

नीता अंबानी साई मंदिरातून बाहेर पडताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने त्यांच्याकडे हात जोडून मोठी मागणी केली. त्या चाहत्यानं हात जोडत नीता अंबानी यांना रोहित शर्माला कॅप्टन करा अशी विनंती केली.  यावेळी नीता अंबानी यांनी त्याला देखील नमस्कार करत बाबा की मर्जी असं उत्तर दिलं.  

मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी शिर्डीत आज साई समाधीचे दर्शन घेतलं. नीता अंबानी यांनी सायंकाळच्या धूप आरतीला हजेरी लावत प्रार्थना केली.  त्या त्यांच्या आईसह साई दरबारी आल्या होत्या. 

मुंबई दिल्ली सामन्यापूर्वी नीता अंबानी यांनी साई समाधीचे दर्शन घेतलं. साई मंदिरातून बाहेर पडताच मुंबईच्या चाहत्याने रोहित शर्माला कॅप्टन करण्याची मागणी केली. दरम्यान, गतवर्षी आयपीएल सुरु असताना देखील नीता अंबानी शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी देखील त्यांनी शिर्डीतील साई मंदिरात हजेरी लावत प्रार्थना केली.

Category

🗞
News
Transcript
00:00कैप्टिन करो अशी मागणी मुंबाई इंडियांच चाहात्याना नीता अमबानीन कड़े केली
00:04मुंबाई याणी दिल्ली सामन्यापुर्वी नीता अमबानीनी आई सहर शिरडी मधे साई समाधिस दर्शन भितला
00:10यारंतल साई मंदिरातुन बाहर पड़तास मुंबाई चाहत्याना रोहितला कैप्टन करेनेंची मागणी केली
00:15आणी त्यावर नीता अमबानी हाथ जोड़त बाबा की मरजिय सम्हणाले
00:40अनिया बातमी सहर बुलेटिद मने अत्ता बेल जाली है इथेस स्थामणांची थोड़ा स्वरात पुन्हा भेटुया नवे अपडेट सहर पुरुशा बुलेटिद मने

Recommended