Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पकडला गोमांसाने भरलेला ट्रक --------------- मीरा भाईंदरमध्ये विहिंपच्या कार्यकर्त्यांकडून ट्रकची तोडफोड ------------------ काशिगाव पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील कारवाई सुरू
मीरा भाईंदरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री गोमांसाने भरलेला ट्रक पकडला. भाईंदर पूर्वेतील गोल्डन परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ट्रकला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली, शिवाय ट्रकची तोडफोडही केली. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 29 April 2025 

काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरु, एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरु 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी 
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार 
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी आर्मी कनेक्शन, मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड

Category

🗞
News
Transcript
00:00मेरा भाहिंदर मधे विश्वहिंदू परिशदेचा कार्या करत्या नी काल रात्री गोमाउसान भरलेला ट्रक पकडला
00:05भाहिंदर पूर्वेतिल गोल्डन परिसरात विश्वहिंदू परिशदेचा कार्य करत्यानी ट्रकला घिराव घलत जोरदार घुशना बाजी केली शिवाई ट्रकची तोड़ फोड़ ही केली
00:14घटनेची माहीति मेंतास नौगर पोलिस घटनास तरी दाखल जाले या प्रकरणी काशिकाव पोलिस ठाड़ा मदे गुणा दाखल करें तले

Recommended