Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये अनेक राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे. खरं तर या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक काश्मीरमध्येच अडकून पडले आहेत. इतर राज्यातील सरकारे पर्यटकांना पुन्हा आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या रस्त्यांवरही शुकशुकाट पसरलाय. जागोजागी सुरक्षा दलाचे जवान नजरेस पडत आहेत. काश्मीरमधील दल लेक येथे बोटींमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी पर्यटकांची झुंबड असते, तर इथली शिकारा राईड करण्यासाठी आधी बुकिंग करावी लागते. परंतु आज इथे पर्यटकांची गर्दी नाही, फेरीवालेदेखील नाहीत आणि शिकारा बोट चालवणारे चालक अक्षरशः बोटेत झोपून आहेत आणि कुणी पर्यटक येतो का? याची वाट बघत आहेत. 

Category

🗞
News
Transcript
00:00Hello everyone, welcome back to my channel.

Recommended