नांदुरा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील टाकरखेड येथील शेतकरी राहुल पुंडलिक वराडे यांनी रब्बी हंगामात सात एकरात 75 क्विंटल मका पिकाचे उत्पादन घेतले. याकरिता सत्तर हजार रुपये खर्च लागला. तसेच लावलेला खर्चही निघाला नसल्याचे या शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. या परिसरात मोठ्या प्रमाणात यावर्षी मका पिकाची लागवड झाली. मात्र, त्या प्रमाणात जनावरे उपलब्ध नसल्याने मक्याची कुट्टी कुणी फुकटही न्यायला तयार नाही. तर मागच्या वर्षी दुष्काळ असताना खान्देशातील रावेर, सावदा येथून हीच कुट्टी शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयात एक गाडी भरून ट्रिप आणली होती. परंतु तिचं कुट्टी यावर्षी शेतकऱ्याने शेतात पसरवली आहे.
Category
🗞
News