दिल्लीला गेल्यावर गुंगीचे इंजेक्शन दिलं असेल आणि त्याची गुंगी अजुन उतरली नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कालचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या शक्ती विरोधात होता आणि या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी सामोर जायला पाहिजे होतं असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना फार करून घेऊ नये आपलं राजकीय भविष्य मोठं होणार आहे.होऊ शकतं त्यांच्याकडे ती क्षमता असल्याचही सांगत खोचक टोला लगावला.
Category
🗞
News