Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
कोल्हापूर मधील राजारामपुरीतील श्री. नागेशकर यांच्या कॅसल हॉटेलच्या मागील बाजूस एक झाड दिसते. त्या झाडावर मोठी फळे आहेत; पण ही फळे नेमकी कोणती ही अनेकांना माहिती नाहीत. ही फळे म्हणजे, करमळ किंवा करंबळ. करंबळाचे फुल कमळासारखे दिसते, म्हणून करंबळ/करमळ असे म्हणतात. कोकण-गोव्याच्या परिसरात या झाडाला करंबळ म्हटले जाते. ही फळे हत्तींना खूप आवडतात. करंबळाच्या फळापासून मुरंबा, सरबत तयार करता येते. शरिराला ते अतिशय उपयुक्त असते. कोल्हापूर महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी हा करंबळ वृक्ष लावला आहे. फळांमुळे तो अनेकांचे लक्ष वेधून घेतो.

रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ : मोहन मेस्त्री
एडिटींग : सुयोग घाटगे

#sakal #news #viral #sakalnews #marathinews #elefentapple #rajarampuri #kolhapur

Category

🗞
News

Recommended