Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Jitendra Awhad : ठाण्यातील प्रति तुळजाभवानी मंदिराचा इतिहास, बांधणी ते निर्माण कार्य


ठाण्यातील गणेशवाडी येथे हेमाडपंथी शैलीत साकारण्यात आलेले प्रति तुळजा भवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना पूजा थोड्याच वेळा सुरू होणार आहे, या महत्त्वाच्या पूजेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे मंदिर पूर्णतः दगडाचे बांधण्यात आलेले आहे, काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे, याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा वापर या मंदिराच्या निर्माणासाठी करण्यात आलेला नाही, सुमारे 1 हजार 350 टन काळ्या पाषाणाचा वापर करुन 33 फुटांचा कलश अन्‌‍ त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, 26 स्तंभ, 20 गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे.

Category

🗞
News

Recommended