Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात, भारतीय नौसेनेचे २६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला... काल बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी गोळी झाडल्यानंतर त्यांच्या मृतदेहाशेजारी, खिन्न मनाने बसलेल्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला होता... त्यानंतर आज नरवाल यांचं पार्थिव आज दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं.. त्यांना नौदलातर्फे मानवंदना दिली गेली.. यावेळी पत्नी हिमांशीच्या भावना अनावर झाल्या.. आणि तिने थेट पार्थिवावर झोकून देत, मोठ्याने टाहो फोडला... तिची ही अवस्था पाहून उपस्थितांचंही मन हेलावून गेलं...पतीला शेवटची मानवंदना देताना पत्नी हिमांशी नरवालनं 'जय हिंद' अशी घोषणा दिली आणि त्याचवेळी तिथे उपस्थित सर्वांचं मन हेलावलं

आता एक महत्त्वाची बातमी आहे दहशतवाद्यांविरोधातील... पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या निशाण्यावर दहशतवाद्यांचे तब्बल ४२ तळ असल्याची माहिती समोर आलीय... सूत्रांनी दिलेल्य माहितीनूसार कारवाईचा रोख ठरल्यास, पीओकेमधील हे सर्व दहशतवादी तळ उध्वस्त केले जाऊ शकतात..उत्तर पीर पंजालमध्ये १० तर दक्षिण पीर पंजालमध्ये ३२ दहशतवादी तळ असल्याचं सांगण्यात येत असून.. भारतीय सीमेलगत असलेल्या यादहशतवाद्यांच्या लाँचपॅडवर, ११० ते १३० दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती आहे...

Category

🗞
News

Recommended