• 3 years ago
पंढरपूर.... सदैव भक्तांची गर्दी असणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध देवस्थान....आणि आता पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशातल्या काशी विश्वेश्वर देवस्थानाकडून प्रेरणा घेतली जातेय.. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काशी विश्वेश्वर देवस्थानाला भेट दिली.. तसंच तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गर्दी व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली.. लवकरच काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात देखील गर्दी व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यन्वित होणार असल्याचं कळतंय.

Category

🗞
News

Recommended