Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/28/2022
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत.. गणपती दर्शन स्पेशल दौरा असं अमित शाहांच्या दौऱ्याचं वर्णन केलं तर चुकीचं ठरणार नाही.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या नेत्यांच्या घरी जाऊन अमित शाह गणपती बाप्पाचं दर्शन घेतील.. तसंच अमित शाह लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत.. सध्या मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत.. सत्तांतरानंतरचा महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा राजकीय सामना असणार आहे.. त्यामुळे नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या  लालबागच्या राजाकडे अमित शाह काय मागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे..  

Category

🗞
News

Recommended