कवी संग्राम बापू हजारे यांच्या 'रिकामटेकड्याचे आत्मवृत्त' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. आटपाट प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला..या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास रामदास फुटाणे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते..तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश सप्रे, किशोर कदम, नागराज मंजुळे, उमेश कुलकर्णी, प्रा. संजय साठे, डॉ. संजय चौधरी यांची उपस्थिती होती. या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन नागराज मंजुळे यांनी केलं..मोठ्या संख्येने कवीप्रेमींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
Category
🗞
News