Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/27/2022
शिर्डीत साईचरणी हार, फुलं आणि प्रसाद वाहण्यावरील बंदी आणखी महिनाभर कायम राहणार आहे...  या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय... या समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आलीय.. हा अहवाल येईपर्यंत हार, फुलं आणि प्रसादाबाबत परिस्थिती जैसे थे राहिल अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय... शिर्डीत विश्वस्त, स्थानिक फूल विक्रेते, ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.. फुल विक्रेत्यांच्या मागणीची मुख्यमंत्री शिंदे यांनीही दखल घेतलीय. या संदर्भात शिंदेंनी विखे पाटील यांच्याशी चर्चा केलीय... जनभावनेचा आदर झाला पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची भावना असल्याचे विखे पाटील यांनी सांगितलंय..  

Category

🗞
News

Recommended