Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/5/2022
क्रिकेट विश्वातील महान फलंदाज अशी ओळख असलेला खेळाडू म्हणजे विराट कोहली. क्रिकेट विश्वात विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. तो नवनवीन रेकॉर्ड करतच असतो. पण मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खास छाप सोडता आलेली नाही. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये मात्र तो दमदार कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. आत्ताच्या सामन्यात त्याने चौकार ठोकला तर आयपीएलमध्ये तो 550 चौकार पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो दुसराच क्रिकेटपटू होणार आहे. याआधी केवळ शिखर धवनने ही कामगिरी केली असून त्याच्या नावावर 664 चौकार आहेत. तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर 509 चौकारांसह असून सुरेश रैना 506 आणि रोहित शर्मा 495 चौकारांसह विराजमान आहेत.

Category

🗞
News

Recommended