Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/4/2022
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पिंपरी चिंचवडच्या शस्त्र विरोधी पोलिसांनी गेम केलाय. एखाद्या चित्रपटाच्या कथानकेला शोभेल अशी कारवाई पोलिसांनी केलीये. चिखली गाव परिसरातील रोकडे यांच्या घरातील तिसऱ्या मजल्या वरील खोलीत हे गुंड दरोडा टाकण्याची तयारी करत होते. मात्र यांची कुणकुण पोलिसांना लागली. मग पोलिसांनी या बिल्डींगबाहेर फिल्डींग लावली. आणि गुंडांचा काही कळायच्या आत पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी धाड टाकून तीन तलवार, एक कोयता, सुरा, हॉकी स्टिक, कटावणी आणि मिरची पावडर जप्त केली आहे.

Category

🗞
News

Recommended