Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/31/2022
एक लॅपटॉप होता, त्यात देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याची सगळी माहिती होती आणि याच लॅपटॉपसहीत वकिलाला उचलण्यात आलंय. वकिलाच्या कुटुंबानेच हा आरोप केलाय. देवेंद्र फडणवीसांना जो नडतो त्याचे काय हाल होतात ते नवाब मलिकांच्या रुपाने महाराष्ट्राने पाहिलंय. आता पुन्हा एकदा अशीच एक कारवाई नागपुरात झालीय आणि या कुटुंबाचा रोख थेट फडणवीसांकडे आहे. वकील सतिश उके यांना ईडीने भल्या पहाटेच घरात घुसून उचललं. हे तेच वकील उके आहेत, ज्यांनी फडणवीसांविरोधात अनेक आरोप केले होते, येत्या चार दिवसात फडणवीसांविरोधात एका प्रकरणाचा निकालही लागणार होता असं उके कुटुंबाचं म्हणणं आहे आणि याच निकालापूर्वी ईडीने उके यांना उचलल्याचा आरोप होतोय. हे उके नेमके कोण आहेत, फडणवीसांसोबत त्यांचं वैर काय होतं आणि ईडीने कोणत्या प्रकरणात त्यांना अटक केलीय सविस्तर समजून घेऊ या व्हिडीओतून..

Category

🗞
News

Recommended