Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
राजस्थान रॉयल्सनं आयपीएल स्पर्धेची सुरूवात विजयानं केली आहे. राजस्थानच्या या विजयात लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं कमालच केली.. चहल गेल्या सिझनपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचा सदस्य होता. राजस्थान रॉयल्सकडून पहिल्याच मॅचमध्ये त्याने चार ओव्हर्समध्ये 22 रन देत 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला आहे. चहलनं हैदराबाद विरूद्ध अभिषेक शर्मा, अब्दुल समद आणि रोमारियो शेफर्ड यांना आऊट करत हा रेकॉर्ड पूर्ण केला. टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय ठरला. यापूर्वी पियूष चावला, आर. अश्विन आणि अमित मिश्रा यांनी ही कामगिरी केली आहे. चहलनं टीम इंडिया, हरयाणा, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा रेकॉर्ड केला आहे. रोमारियो शेफर्डला आऊट करत त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केले. त्यामुळे राजस्थानच्या या विजयात लेग स्पिनर युजवेंद्र चहलचा महत्त्वाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.

Category

🥇
Sports

Recommended