Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
बॉलिवूडमधील एका कलाकारानं नुकतंच लोकलमधून प्रवास करत सर्वांनाच चकित केलं आहे. मास्क,काळा चष्मा घालून या अभिनेत्यानं लोकलन प्रवास केला. त्यामुळे कोणालाही या अभिनेत्याला ओळखता आलं नाही असं दिसतय.तो अभिनेता म्हणजे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये एक वेगळ स्थान मिळवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. .नवाजुद्दीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. वाजुद्दीन सिद्दीकी मीरा रोडमध्ये त्याच्या आगामी एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. काही वेळातच त्याला एका कार्यक्रमासाठी शहराच्या पलीकडे जायचं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीतून बचाव करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी अभिनेत्याने आपल्या आलिशान कारने जाण्याऐवजी मुंबई लोकलने जाण्याचा निर्णय घेतला.

Category

🗞
News

Recommended