• 3 years ago
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षिका संगीता पाटील यांची पदोन्नती झाली.संगीता पाटील यांची चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे बदली झाली. आपल्या शिक्षिकेची बदली झाल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालत रडायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. त्यामुळे शिक्षिका संगीता पाटील यांना ही अश्रू अनावर झाले.

Category

🗞
News

Recommended