• 3 years ago
पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे शिवसेनेचे मेळावा झाला. मेळाव्यानंतर राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली. निलेश राणे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले, भाजपचे निलेश राणे हे आमचं प्रॉडक्ट आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर राणे पिता-पुत्र कुठेच नसते अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

Category

🗞
News

Recommended