• 3 years ago
दापोली येथील साई रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनचे मंत्री अनिल परब यांनी पलटवार केला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट माझे नाहीच. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी हे रिसॉर्ट तोडून दाखवावेच, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. किरीट सोमय्या हे नौटंकी करत आहेत. त्यांच्याकडून माझी प्रतिमा मलीन केली जात आहे. दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करायला किरीट सोमय्या हे काय पालिकेचे नोकर आहेत का, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Category

🗞
News

Recommended