Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/26/2022
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात कोलकाता विरुद्ध चेन्नई या लढतीने होतीय आणि यात चाहत्यांच्या नजरा आहेत त्या धोनीकडे. कारण, धोनी यावेळी रविंद्र जाडेजाच्या नेतृत्त्वात खेळणार आहे आणि त्यांची पहिलीच लढत होतीय ती कोलकात्याविरुद्ध. या लढतीचं वैशिष्ट्य म्हणजे कोलकात्याचं नेतृत्त्व मुंबईकर श्रेयस अय्यरकडे आहे. श्रेयस मूळचा मुंबईचा असल्याने त्याला वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी चांगल्याप्रकारे माहीत आहे. त्यामुळे खेळपट्टीनुसार अंतिम संघ निवडण्यात त्याला फारशी अडचण होणार नाही. श्रेयसने याआधी दिल्ली कॅपिटल्सचेही नेतृत्व केले. शिवाय नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेत श्रेयसने कमालीचं सातत्य राखलं होतं. टी-२० मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकून तो मालिकावीर ठरला होता. सर्वच फ्रँचायजींनी संघाची आता पुनर्बांधणी केलीय, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक कर्णधारासमोर अंतिम अकरा खेळाडूंची बांधणी करणंही तेवढंच आव्हानात्मक असेल.

Category

🥇
Sports

Recommended