Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/2/2021
Pimpri-Chinchwad : 16 कोटीचे झोलगेन्स्मा हे इंजेक्शन घेतलेल्या वेदिका शिंदेचे निधन

Bhosari येथील ११ महिन्यांच्या Vedika Saurabh Shinde हिला Spinal Muscular Atrophy (SMA) Type 1 हा दुर्मिळ आजार झालेला होता. त्यावर उपचाराकरिता तिला पुण्यामधील (Pune) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. झोलगेन्स्मा (Zolgensma) हे १६ कोटीचे रुपयांचे इंजेक्शन दीड महिन्यांपूर्वी तिला दिले होते. रविवारी सायंकाळी तिचे निधन झाले आहे. Vedika च्या उपचाराकरिता लोकवर्गणीमधून निधी उभारलेला होता. अमेरिकेमधून (America) ते इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्यावर ६ कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते. १५ जून दिवशी Vedika ला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता. पण, सायंकाळी ६ च्या सुमारास तिचे निधन झाले आहे.

#vedikashinde #spinalmuscularatrophytype1 #Bhosari #PimpriChinchwadMunicipalCorporation

Category

🗞
News

Recommended