Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस सहायता केंद्राच्या परिसरातल्या पैडी जंगल परिसरात मोठ्या संख्येत नक्षली तेंदूपाने संदर्भातील खंडणी वसूल करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागात एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळाची चकमकीनंतर पाहणी केल्यावर 13 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. यात सहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनास्थळावरून एके-47- एस एल आर रायफल -303  रायफल, कार्बाइन ,12 बोअर रायफल -मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
#Dilipwalsepatil #Gadchiroli #Police #Vidarbha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended