Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
क्राईम ब्रांचचा (Crime Branch) अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाकडून लाखोची खंडणी उकळणाऱ्या तुषार शीलवंत या तरुणाला मानपाडा पोलिसांनी (Police) कल्याणात सापळा रचून अटक केली. पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्यानंतर त्याच्याकडे आणखी १० लाख रुपयाची खंडणी त्याने मागितल्या नंतर याप्रकरणी तरुणाने मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सकाळी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या तुषारला दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended