Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
सातारा - साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेकीचा आमदार शशीकांत शिंदे यांनी निषेध करून या प्रकाराला जबाबदार असलेल्यांना पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करावी, त्याचा हेतू माहित करून घ्यावा, अशी मागणी केली आहे. आमदार शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा संबंध नाही. याचिकाकर्ते सदावर्ते त्यांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. मराठा आरक्षणाचे कोणी राजकारण करतंय का, याचा शोध पोलिसांनी करावा. मराठे पाठीमागून वार करत नाहीत समोरून वार करतात. या सर्व घटनांमागचा सुत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.
#Marathareservatio #shashikantshinde #reservation #Satara
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended