Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/11/2017
RAVYACHE PAKATIL LADDU
#BINGMARATHIRECIPE


लाडू या खाद्यप्रकारामध्ये आपला महाराष्ट्र तास बराच संप्पन्न आहे,
इतका कि आपल्याकडे या लाडूच्या नावाने चक्क एक हॉटेल सुद्धा आहे,
दिवालीच्या फराळात दरवर्षी तेच तेच प्रकार खाऊन आपल्याला कंटाळा नाही येत तरीपण कुठंतरी नवीन काही करावे अशी खुमखुमी आपल्या प्रत्येकाला असते ,
तर आज जरा वेगळी पण जराशी ओळखीची अशी रेसिपी
पाकातले रव्याचे लाडू
पाकातले रव्याचे लाडू बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल
१ वाटी बारीक रवा
१ वाटी साखर
४ ते ५ चमचे साजूक तूप
आवडीप्रमाणे मनुके
१ लहान चमचा वेलची पूड

सर्व प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.
पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा.
साखर वितळली आणि पाण्याला उकळी फुटली कि ३ ते ४ मिनिटात एकतरी पाक तयार होतो
भाजलेल्या रव्यात मनुके व वेलची पूड मिसळा वरून यात पाक ओता. गुठळ्या न होता मिक्स करा.
आता हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे.
१५ टेन २० मिनटात मिश्रण आळते. मग लगेच लाडू वळा.
तयार झाले रव्याचे पाकातील लाडू